तू नाहीस फक्त राजकुमार स्वप्नातला

 


 

तू नाहीस फक्त

राजकुमार स्वप्नातला...

काळजात जपलेल्या

निश्चल भावनांचा तू

मूर्तिमंत देह आहेस.

खोलवर दडपूनही जो  

कधीच गारद होत नाही,

तो, माझाच अस्पष्ट हुंकार आहेस

तुला लपेटून अंत

होतो साऱ्या वेदनांचा.

तूझ्यातच सामावलेत,

माझ्या स्वप्नांचे बिलोरी मनोरे,

ज्याच्या भग्न खुणा

मी जपत असते जीवापल्याड.

आठवणींच्या उधाणलेल्या

अजस्त्र लाटांनी

चिंब होतात जाणीवा-नेणीवा.

माझ्या कातर क्षणांना

अलिप्ततेने  दृष्टीआड करणारा

करुणेचा सागर आहेस.

तरीही पुन्हा पुन्हा

होत असेल मोह

तुलाच साद घालण्याचा

तर, नक्कीच तू माझ्याच

आत्मतेजाचा  

प्रखर स्त्रोत आहेस.

© मेघश्री श्रेष्ठी.

सौ. गुगल
सौ. गुगल.


 

Comments

A mit said…
कविता वाचुन आरती प्रभु आठवल्या, keep it up, कुसुमाग्रजांची वादळ वेल हा काव्य संग्रह वाचा नक्की

Popular posts from this blog

नात्यातील Red flags म्हणजे काय? Red flags कसे ओळखायचे? Red flags असणारे नाते टिकवायचे का?

भूतकाळाच्या मगरमिठीतून स्वतःची सुटका कशी कराल?

किस करण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत?/Benefits Of Kissing